इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मथुरा – राया कस्बाच्या राधा गोपाल बागमध्ये फटाक्यांच्या २२ दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत १८ हून अधिक नागरिक जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर आहे. शार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
ही आग लागल्यानंतर स्थानिक पोलिस या ठिकाणी तातडीने पोहचले. पण, अग्निशमन दलाच्या गाड्या व रुग्णवाहिका या ठिकाणी पोहचल्याच नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. आग लागल्यानंतर एक तासानंतर या गाड्या पोहचल्याचे बोलले जात आहे. दरम्यान स्थानिकांना पाणी व टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातून आग विझली नाही.
दिवाळीची सर्वत्र लगबग सुरु असतांना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही लाग लागली. यावेळी मोठया प्रमाणात फटाके खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यात ही घटना घडली.