..
इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क
विश्वचषक २०२३ मध्ये आज बंगळुरूच्या एम.ए. चिनन्नास्वामी स्टेडियमवर आज एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितने स्वतःच्या नावावर केला. त्याने आज दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. एबीच्या नावावर ५८ षटकार होते, आता रोहितच्या नावावर ६० षटकार झाले आहेत.
पहिल्या डावाच्या ७ व्या षटकात कोलिन एकरमॅनच्या एका चेंडूवर रोहितने ९२ मीटर लांब सिक्स मारला आणि वन-डे क्रिकेटमधील हा एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. रोहित ६१ धावांवर बाद झाला आहे. याआधी एबी डिव्हिलियर्स- ५८ षटकार, (२०१५), ख्रिस गेल- ५६ षटकार, (२०१९) आणि शहिद आफ्रिदी- ४८ षटकार (२००२) असे एका कैलेंडर वर्षातील सर्वाधिक षटकारांचे विक्रम होते.
याखेरीज विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारा कर्णधार म्हणून देखील रोहितला आज मान्यता मिळाली. त्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नावे असलेला २३ षटकारांचा विक्रम आज मोडला. आता विश्वचषकातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम देखील रोहितच्या रडारवर आहे.