इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. डब्यांच्या बाहेर लांबच लांब रांगा सर्व स्थानकावर आहे. सुरतमध्ये स्टेशनवर एवढी गर्दी होती, की ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
सुरत रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत पश्चिम रेल्वे वडोदरा येथील पोलिस अधीक्षक सरोजिनी कुमारी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. रेल्वेचे कन्फर्म तिकीट असूनही अनेक जण या नियोजीत रेल्वेमध्ये प्रवेश करू शकत नाही.
एकाने आपबीत्ती सांगतांना सांगितले की, जे लोक आधी गाडीत बसले होते. त्यांनी रेल्वेच्या डब्याचा दरवाजाही बंद केला होता. ते कोणालाही ट्रेनच्या डब्यात येऊ देत नव्हते. एवढा मोठा जमाव पाहून पोलिसांनीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिला.