इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तराखंड येथील उत्तरकाशीतील सिल्क्यरा ते दांडलगावपर्यंत निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर ३६ मजूर अडकल्याची घटना समोर आली. रविवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. या ठिकाणी मजुरांना बाहेर काढण्याचे, ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती समोर आली आहे. उत्तरकाशीचे एसपी अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की,सिल्क्यरा बोगद्यामध्ये बोगद्याचा एक भाग सुरुवातीच्या ठिकाणाहून सुमारे २०० मीटर पुढे तुटला आहे. बोगद्याच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या एचआयडीसीएलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ३६ लोक अडकले आहेत. बोगद्यात असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आम्ही लवकरच सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढू.”
या ठिकाणी पोलीस दलासह एसडीआरएफ आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले आहे.