इंडिया दर्पण ऑनाईन डेस्क
अयोध्या : श्रीराम जन्मभूमी अयोध्येत २२ लाख २३ हजार दिव्यांना प्रज्वलित करून गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात प्रमाणपत्र स्वीकारले आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले की, आज पवित्र अयोध्येचा प्रत्येक कोपरा भक्तीच्या दिव्य तेजाच्या अलौकिक छायेत उजळून निघाला आहे. परमपूज्य संतांचा आशीर्वाद आणि राज्यातील जनतेच्या सहकार्याने यंदाही ‘राममय’ अयोध्येत सर्वाधिक दिवे लावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे.ही दैवी उपलब्धी सर्व राम भक्तांना समर्पित आहे. जय श्री राम!
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर पुढील वर्षी २२ जानेवारी २०२४ प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरयू नदीच्या काठावर आरती केली. त्याआधी राज्याभिषेक कार्यक्रमाला संबोधित केले.
योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येत सन २०१७ पासून दीपोत्सवाची सुरुवात केल्यानंत आता दीपांच्या संख्येत दरवर्षी वाढ झाली आहे. त्यातच विक्रमांची नोंदही वाढत आहे.