इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नेमळटांना एवढच सांगतोय, आज तुम्ही आमची पोस्टर फाडली. निवडूका आल्यावर आम्ही तुमची मस्ती फाडणार असे आव्हान आज उध्दव ठाकरे यांनी मुंब्रात जाऊन शिंदे गटाला दिला. यावेळी त्यांनी शाखेच्या जागेवर ठेवलेला खोका बाजूला करा नाही तर आम्ही बाजूला करु असेही सांगितले. ज्यांना सत्तेचा माज आलाय त्यांनी शिवसेनेची शाखा पाडलीय असेही ते म्हणाले. हिंमत असेल तर पोलिसाला बाजूला समोर या असेही आव्हानही त्यांनी दिले.
मुंब्र्यात ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा तोडण्यात आली त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेले. या ठिकाणी हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे येथे जाण्यास पोलिसांनी ठाकरे यांना मज्जाव केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या विनंतीला मान देऊन दुरुनच शाखेची पाहणी करुन परतले. पण, या गोष्टीनंतर काही वेळाने शिंदे गटाने जोरदार जल्लोष केला. यावेळी फटाक्याची आतषबाजी सुध्दा केली. ठाकरे येण्याअगोदरच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेला घेराव घातला होता. उद्धव ठाकरे यांना शाखेपर्यंत पोहोचू न देण्याचा निर्धारही केला होता. त्यामुळे त्यांनी ठाकरे परत गेल्यावर हा जल्लोष केला.
या सर्व गोंधळानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधीत करतांना सांगितले की, त्यांना सत्तेचा माज आला आहे. त्यांनी बुलडोझर लाऊन शाखा पाडली.
या चोरांनी मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला आहे, आता या मधमाशा कुठे कुठे डसतील असेही सांगितले. मी लढण्यासाठी मैदानात आलो आहे. यावेळी त्यांनी यांची मस्ती
निवडणुकीत फाडतो…खऱा बुलडोझर काय असतो तो निवडणुकीत दाखवू असेही त्यांनी सांगितले. या शाखेची सर्व कागदपत्रे आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
पोस्टर फाडले
उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडण्यात आल्यामुळे येथील वातावतरणही तापले होते. पण, आज उध्दव ठाकरे गटाने या ठिकाणी शक्तीप्रदर्शन केले. तर दुसरीकडे शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी या दौ-यात सुरु केल्याचे दिसले.
जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप
सकाळी राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते. यातील ९० टक्के होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान १५ मिनिट तरी लागतात.आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!