अँजिओप्लास्टीच्या दरम्यान बंद पडलेल हृदय डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन पुन्हा केलं सुरू !
जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान कार्डीक अरेस्ट असल्यामुळे डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल माझं हृदय पुन्हा सुरू केलं. तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं, असा भावनिक संवाद राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाला. यावेळी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्यात. बघा हा व्हिडिओ