इंडिया दर्पण वृत्तसेवा
वाडीव-हे गावातील वीज मिटर बसवून देण्याच्या मोबादल्यात ७ हजाराच्या लाच प्रकरणात महावितरणचे तंत्रज्ञ व खासगी इसम लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. १२ हजाराची लाच मागून तडजोडीअंती ७ हजार खासगी व्यक्तीमार्फत घेतांना लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.
याबाबत माहिती देतांना एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांचे वाडीव-हे गावातील दोन कमर्शियल, व एक घरगुती मीटर बसवुन दिल्या बद्दल बक्षीस म्हणून १२ हजार रुपयाचीमागणी करुन तडजोडी अंती ७ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून सदर रक्कम खाजगी इसम यांच्या कडे देण्यास सांगीतले व सदर रक्कम खाजगी ईसमाकडुन हस्तगत करण्यात आली आहे, म्हणून गुन्हा.
अशी आहे सापळा कारवाई
युनिट:- नाशिक
तक्रारदार:- पुरुष, वय- 37 वर्षे, रा. वाडीवर्हे, ता. इगतपुरी जि. नाशिक
आलोसे:-
1.श्री.नागेश्वर रघुनाथ पेंढारकर, वय -35 वरीष्ठ तंत्रज्ञ, महावितरण कार्यालय वाडीवर्हे ता. इगतपुरी जिल्हा नाशिक,
- शुभम रामहरी जाधव वय 23 रा . वाडीवर्हे ता इगतपुरी
- लाच मागणी रक्कम:-* 12000 /- रू.
- तडजोडीअंती मागणी :- 7000/- रू.
- लाचेची मागणी पडताळणी दि.:- दि.30/09/2023
- लाच स्वीकारली :-* दि. 30/09/2023 रोजी 7000/- रू.
लाच मागणी कारण:- तक्रारदार यांचे वाडीवर्हे गावातील दोन कमर्शियल, व एक घरगुती मीटर बसवुन दिल्या बद्दल बक्षीस म्हणून 12000 रू ची मागणी करुन तडजोडी अंती 7000 रू स्वीकारण्याचे मान्य करून सदर रक्कम खाजगी इसम यांच्या कडे देण्यास सांगीतले व सदर रक्कम खाजगी ईसमाकडुन हस्तगत करण्यात आली आहे, म्हणून गुन्हा. हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.
सापळा अधिकारी:-
श्री नितीन पाटील
पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि., नाशिक मो. नं. 9284661658
सापळा कार्यवाही व मदत पथक :-
पोना/अजय गरुड,पोना/प्रभाकर गवळी, मपोशि/शितल सुर्यवंशी,