इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुवहाटी : सध्या मणिपूर हे राज्य पेटलेले असून तेथे गेल्या तीन-चार महिन्यांपासून असंतोष आहे, परंतु मणिपूर शेजारीच असलेल्या आसाम मध्ये देखील अलीकडच्या काळात काही भयानक घटना घडत आहेत, त्यातच करीमगंज जिल्ह्यात एक माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली, हैवान वृत्तीच्या माणसाने अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून प्रियकर व त्याच्या दोन मित्रांनी तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. आसामच्या ही संतापजनक घटना घडली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
एकटी मुलगी पाहून साधला डाव
काही माणसे राक्षसी वृत्तीचे असतात किंवा ते हैवाण बुद्धी किंवा डोक्याचा वापरच करत नाहीत, या हत्याकांडाचा सूत्रधार राहुल दास हा रेल्वेचा नवनियुक्त चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. एक प्रकारे सरकारी नोकरी मिळाल्याने तो हवेतच होता, त्यामुळे त्याला काय करू काय नको असे झाले असावे.
त्याचे या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तो त्या मुलीवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. मुलगी नकार देत होती. पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे समजल्यानंतर आरोपी दोन मित्रांसह घरी गेला. तिघांनी बळजबरीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून खून केला व नंतर मृतदेहावर बलात्कार केला. ही घटना घडल्यावर त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपी तेथून पसार झाले.
आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
आता मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने आपल्यावर कोणी संशय घेणार नाही आणि पकडणार नाही या भ्रमात हे आरोपी वावरत होते मात्र त्याच दिवशी करीमगंज बायपासजवळ तिचा मृतदेह सापडला. मुलीच्या वहीत नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. बिप्लब पॉल, शुभ्रा मालाकर व राहुल दास अशी आरोपींचे नावे आहेत.
दास हा सूत्रधार आहे. त्याने चौकशीत मुलीसोबतचे प्रेमसंबंध उघड केले. आपण तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे हे भयानक कृत्य केले, अशी कबुली दिली. शुभ्रा मालाकरकडून दोन सिमकार्ड घेतले होते. त्यातील एक तो आरोपी व पीडित मुलगी वापरत होते. या आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
Outrageous! Rape on girlfriend’s body after murder… Three arrested…