इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर नाकारण्यात आल्यामुळे राज्यभर त्यावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला. तर मनसेने दम भरल्यानंतर बिल्डिंगच्या सचिवाने माफी मागितली. याच घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ट्विट करून प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांनी या घटनेचा संदर्भ घेत व्यंगचित्र काढले. हे व्यंगचित्र मनसेच्या सोशल मीडियावर टाकण्यात आले असून त्यात राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं… आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूस….
राज ठाकरे यांनी काल केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते…मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.
हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे ! असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. आज मनसेच्या ट्विटरवर व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे……ते चांगलेच व्हायरल होत आहे.
After the Mulund incident, Raj Thackeray’s cartoon tweet manse.. See what he actually said…