इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : येथे काही मुंबईमध्ये परप्रांतियांनी चांगले वर्चस्व सर्व निर्माण केले होते. परंतु हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून परप्रांतीयांची दादागिरी बंद केली. परंतु अद्यापही काही असा प्रकार काही ठिकाणी दिसून येतो. अशीच एक घटना मुंबईत घडली एका परप्रांतीयाच्या टोळक्याने मराठी युवकाला जय श्रीरामचा नारा देण्यास भाग पडले. मात्र त्याने नारा दिला नाही म्हणून त्यांनी त्याला बेदम मारहाण केले असून दोघांना अटक केली असून दोन जण मात्र अद्याप फरार आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातील गोकुळनगर परिसरात एक भयानक घटना घडली. परप्रांतीय तरुणांच्या चार जणांच्या टोळक्याने एका मराठी युवकाला ‘जय श्रीराम’चा नारा देण्यास सांगितले. मात्र त्याने ‘जय श्रीराम’चा नारा दिला नाही म्हणून या चार तरुणांकडून त्या मुलास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याअगोदर मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी ही घटना उघड झाली आहे.
या परप्रांतीयांच्या एका टोळक्याने मराठी युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी आता त्या चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज तिवारी (वय ३०) आणि रोशन मिश्रा यांना अटक केली आहे. अरुण पांडे आणि राजेश रिक्षाचालक हे दोन आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.या प्रकरणामुळे मुंबईत चांगलीच खळबळ उडाली आहे.
जखमी युवकावर उपचार सुरू
कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगरमध्ये राहणारा सिद्धार्थ अंगुरे असे या युवकाचे नाव आहे. सिद्धार्थ हा त्याच्या भावासोबत जात असताना चार परप्रांतीय युवकांनी त्याला वाटेतच अडवले आणि त्याला जय श्री राम म्हणायला सांगितले. त्याने त्याला नकार दिल्यानंतर त्या युवकांनी सिद्धार्थ व त्याच्या भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर त्या चार जणांनी सिद्धार्थला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फरफटत नेले.
या जखमी युवकाला रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर या युवकाची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार जणांपैकी दोघांना अटक केली आहे तर फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. या मराठी युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे अधिकच संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
Marathi youth brutally beaten