इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर अगोदर मुख्यमंत्री व आता विधानसभा अध्यक्षांनी आपला दौरा रद्द केला आहे. हे दोन दौरे रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी यह डर अच्छा है असे म्हणाले. मुख्यमंत्री नेमके परदेशात जाऊन करणार काय ? हा प्रश्न विचारला तर ३० मिनिटात मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा घाणाला जाणार होते. मात्र इकडे आमदार अपात्रताप्रकरण रखडवून तुम्ही संसदीय लोकशाहीची हत्या करताय. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला. ४ महिने झाले, तेव्हापासून निकाल पुढे ढकलला जात आहे. मी अध्यक्षांना विनंती केली, तुम्ही जाऊ नका राज्याची बदनामी करू नका. त्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
हे दौरे रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला. नार्वेकर जी ह्यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर जी ह्यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे.त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे असे म्हटले आहे.
Aaditya Thackeray