इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमेरिकेत शालेय मुलींनी नग्न फोटो पाठवण्यास नकार दिल्यानंतर शाळेत व सार्वजनिक ठिकाणी बाँम्बस्फोट घडवण्याच्या १५० हून अधिक बनावट धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात Federal Bureau of Investigation ने एका पेरुव्हियन व्यक्तीला गजाआड केले आहे. हा धमक्या देणारा ३३ वर्षीय एडी मॅन्युएल नुनेझ सँटोस असून बेवसाईट डेव्हलपर आहे.
त्याने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या धमक्या पाठवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे अमेरिकेत सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. हा सर्व प्रकार करताना त्याने तो लुकास नावाचा किशोरवयीन मुलगा असल्याचे भासवले आणि किशोरवयीन मुलींशी संवाद साधण्यासाठी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म वापरला. त्याने हा संवाद साधतांना दोन मुलींकडे नग्न फोटोंची मागणी केली. पण, त्याला नकार मिळाल्यानंतर त्याने या मुलींनी शाळांवर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली.
या मुलींच्या तक्रारीबरोबरच Federal Bureau of Investigation ला १५ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, कनेक्टिकट, ऍरिझोना आणि अलास्का येथील विविध सार्वजनिक ठिकाणांवर बॉम्ब स्फोट करण्याची धमक्या आल्याच्या तक्रारी आल्या. या धमक्यांमध्ये विमानतळ, रुग्णालये आणि अगदी शॉपिंग मॉललाही लक्ष्य करण्यात आले. या ईमेल्समुळे पोलिसांना कारवाई करण्यास, शाळा रिकामी करून बंद करण्यास, फ्लाइटला उशीर होण्यास आणि रुग्णालयाला लॉकडाउनमध्ये जाण्यास भाग पाडले.
शालेय मुलींनी नग्न फोटो नाकरल्याने बदला घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले. गुरुवारी, नुनेझ सॅंटोस विरुद्ध पाच आरोप असून ज्यात धमकीचे संदेश पाठवणे, खोटे इशारे देणे, लहान मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणे आणि बाल पोर्नोग्राफी मिळविण्याचा प्रयत्न करणे यांचा समावेश आहे.