येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील छत्रपती संभाजी रोडवरील नाकोड फॅशन कपड्याच्या दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. १३ सप्टेंबर रात्रीच्या सुमारास दुकानाच्या वरच्या साईडने पत्रे वाकून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्यांनी गल्ल्यातून २५ हजार रुपये गल्ल्यातून प्रसार केले.
या चोरीच्या घटनेत पाच ते दहा हजार रुपये किमतीचे कपडे देखील चोरीला गेले आहे. तसेच चोरी करतानांचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अशी माहिती नाकोड पैठणीचे संचालक यांनी दिली आहे. अधिक तपास येवला शहर पोलीस स्टेशन करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहे.
याअगोदर पैठणीच्या दुकानातून चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरांनी आता व्यापा-यांना लक्ष केले आहे. या चोरीच्या घटनेत सीसीटीव्ही कॅमेरात चोर कैद होत आहे. पण, त्यामुळे चोर सापडेल का असा प्रश्नच आहे. पण, यामुळे पोलिसांना चोरांचा शोध घेणे सोपे झाले आहे.
A daring heist at a fashion clothing store in Yeola; The incident was caught on CCTV