इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -विश्वचषकाचा भारताचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलियाबरोबर रविवारी होणार आहे. चेन्नईच्या मैदानावर ही पहिली लढत रंगणार आहे. हे दोन्ही संघ विश्वचषकाचे दावेदार असल्यामुळे या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा या विश्वचषकाची सुरुवात बलाढ्य संघाबरोबर होणार आहे. यात भारताने जर हा सामना जिंकला तर त्यांचा प्रचंड आत्मविश्वास वाढले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही यजमान भारताचा पराभव करत विजयाने सुरुवात करण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. त्यामुळे पहिलाच सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
विश्वचषकासाठी भारत यजमान आहे. त्यामुळे भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान या चषकाचे सामने होणार आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. आता भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सायंकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरु होईल. तर १ वाजून ३० मिनिटांनी टॉस होणार आहे. या पहिल्याच सामन्यात शुबमन गिल याला डेंग्युची लागण झाल्यामुळे भारताचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही.
भारताची टीममध्ये रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू आहे. तर ऑस्ट्रेलिया टीममध्ये पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क हे खेळाडू आहे.
India’s first World Cup match against Australia in Chennai