सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चांद्रयान ३ ची प्रतिकृती करून शिक्षणाबरोबर आपल्या अंगातील कलागुणांना वाव दिला आहे.चांद्रयानची ३ ची प्रतिकृती केलेल्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद दिसत होता. चंद्रयान ३ प्रतिकृती साठी लागणारी शैक्षणिक साहित्य येथील शेतकरी ज्ञानेश्वर गडाख यांनी उपलब्ध करुन दिले होते
देवपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम करत असते. ही शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देऊन विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. इस्रोमार्फत पाठवलेल्या चंद्रयान ३ ची उत्सुकता चिमुकल्यांमध्ये पाहायला मिळाली. त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने अतिशय सुंदर चंद्रयान बनविले आहेत. देवपूर पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांनी चंद्रयान बनवले आहेत तसेच त्यांच्यामध्ये चंद्रयान तीन बद्दल खूप उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळाली.
या विद्यार्थ्यांना चंद्रयान बनवण्यासंदर्भात विविध कल्पना व मार्गदर्शन राजगुरू सर, मंगला सांगळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी वाघ व सर्व शिक्षक वृंद यांनी केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चांद्रयानाचे सर्व पालकांमधून कौतुक केले जात आहे. या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन सरपंच, उपसरपंच,शाळेतील पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य यांनी केले.
प्रतिकृती द्वारे करुन दाखवले
मी एक शेतकरी असून माझे शिक्षण बारावी सायन्स पर्यंत झाले असून . ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्या गोष्टीत कमी नसतो त्यांना जर योग्य मार्गदर्शन केले तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पुढे वैज्ञानिक बनू शकतात. कोणतेही गोष्ट अशक्य नसून त्यांनी त्यांच्या या चंद्रयान तीन च्या यशस्वी प्रतिकृती द्वारे दाखवून दिले आहे.
ज्ञानेश्वर गडाख, पालक
A replica of Chandrayaan 3 was made by the students of this Zilla Parishad school in Sinnar taluka