नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाईट बिल अपडेट करण्याचा बहाणा करीत व्हॉटसअपवर लिंक पाठवून वृध्दाची बँक खात्यातील रक्कम परस्पर लंपास करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज कंपनीतून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी वृध्दास ८१ हजार रूपयांना गंडा घातला आहे.
या फसवणूक प्रकरणी सतिष उमाकांत एकलहरे (६१ रा.आराध्या अपा.काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एकलहरे यांच्याशी गेल्या २९ जुलै रोजी ०९०९१३६६९५१ या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. यावेळी भामट्यांनी वीज कंपनीतून बोलत असल्याचे सांगून लाईट बिल अपडेट करण्यासाठी फोन केल्याचे सांगण्यात आले. यावेळी भामट्यांनी एकलहरे यांचा विश्वास संपादन करीत व्हाटसअपच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठविण्यात आली.
या लिंकवर डक डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले असता ही फसवणुक करण्यात आली. अॅप डाऊन लोड करताच भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील सुमारे ८० हजार ९९७ रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून लांबविली. चौकशी अंती एकलहरे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten