एकाच छतासाठी भव्य आयटी पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा : खा गोडसे
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात आयटी पार्क व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डाच्या झालेल्या बैठकीत दोन टप्प्यात शंभर एकर जागा आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आयटी पार्कचा मार्ग मोकळा झाला असून सुशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
नाशिक येथे आयटी पार्क नसल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना नोकरीसाठी म्हणून पुणे,बंगलोर आदी मोठ्या शहरांमध्ये जावं लागत असे. नाशिक शहर परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावा अशी मागणी शहरातील शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे सतत होत होती. यातूनच शहर परिसरात विखूरलेल्या लहानसहान आयटी कंपन्यासाठी एकाच छताखाली प्रशस्त जागेवर आयटी पार्क व्हावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून खा.गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले होते.
खासदार गोडसे यांनी उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची अनेकदा मंत्रालयात जाऊन भेट घेत नाशिक परिसरात आयटी पार्क होणे किती गरजेचे आहे हे ना.सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले होते. याबरोबरच आयटी पार्क उभारण्यासाठी कमीत कमी शंभर एकर जागा आरक्षित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून खा.गोडसे यांनी नामदार सामंत यांच्याकडे तगादा लावला होता. खा.गोडसे यांची सुशिक्षित तरुणांविषयीची तळमळ
ना.सामंत यांना भावल्याने त्यांनी आजच्या बोर्ड मिटिंगवर सदरचा विषय घेतला होता.मिटिंग सुरू होताच आयटी पार्कसाठी जागा आरक्षित करण्याच्या मुद्द्यावर नामदार सामंत यांनी खा.गोडसे आणि सेक्रेटरी स्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नाशिक तालुक्यातील राजूर बहूला येथे आयटीसाठी दोन टप्प्यात शंभर एकच जागा आरक्षित ठेवण्याच्या निर्णयाला मान्यता दिल्यात आली. यावेळी एमआयडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, विकास आयुक्त कुशवाह, एमआयडीसीचे ज्वॉईड कार्यकारी अधिकारी मलिक नेर, उद्योग विभागाचे ज्वॉईड सेक्रेटरी पुलकुंडवार आदीसह उद्योग विभागाचे आधिकारी मोठया संख्येने उपलब्ध होते.
Nashik IT Park under one roof: