मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई विमानतळावर खासगी विमान क्रॅश झाल्याची दुर्घटना घडली आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी तर इतर जण सुखरुप असल्याची माहिती मिळली आहे. हे खासगी विमान विशाखापट्टनम येथून मुंबईला आले होते. या विमानात ६ व २ क्रू मेंबर्स होते.
आज सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. विशाखापट्टनमच्या विझाग येथून निघालेले विमान मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी खाली उतरत होते. ही घटना घडल्यानंतर एयरपोर्ट अथॉरिटी टीम, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा पथकांनी तातडीने विमानात असलेले क्रू-मेंबर्स आणि इतर नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.
या विमानात जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
मुंबई विमानतळावर दररोज एकूण ९०० विमानांची ये-जा होते. विमान क्रॅश झाल्याने काही वेळासाठी मुंबई विमानतळावर टेक ऑफ आणि लॅन्डिंग बंद झाले.
Private plane crashes at Mumbai airport
https://x.com/MGadnis/status/1702294621647413484?s=20