इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : दारू, मद्य म्हटले की आयुष्य बर्बाद करणारी गोष्ट. मद्याच्या सेवनाने अनेकांचे जीवन, संसार उद्धवस्त झाल्याचे आपण पाहिले आहे. परंतु, याच मद्याच्या कंपनीने गुंतवणुकदारांना मालामाल केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
शेअर बाजारातील घसरण असो किंवा बंपर वाढ असो, हरियाणातील मद्याची कंपनी पिकाडिली ऍग्रो लिमिटेडचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सोमवारी बाजारात घसरण दिसून आली असली तर या कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं होतं. तर मंगळवारीही बाजारातील तेजीदरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागले आहे. आज कंपनीचा शेअर ३१२.४० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर उघडला.
२९ सप्टेंबरपासून या शेअरला सातत्याने अपर सर्किट लागत आहे. एका महिन्यात स्टॉकमध्ये जवळपास २०० टक्के वाढ झाली. तर ज्या गुंतवणूकदारांनी सुरुवातीला या कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य १२.४९ कोटी रुपये झाले आहे. काही दिवसांपूर्वी पिकाडिली ऍग्रोला जगातील सर्वोत्कृष्ट सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक कंपनीचा पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं कंपनीच्या शेअर्समध्ये स्वारस्य वाढले आहे. कंपनीच्या इंद्री दिवाळी २०२३ एडिशनला सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे.
असा झाला फायदा
१९९७ मध्ये १ लाख गुंतवणाऱ्या गुंतवणुकदारांनी जर आताही हा शेअर ठेवला असेल तर त्यांच्या १ लाख रुपयांचे मूल्य आता १२.४९ कोटी रुपये झाले आहे. यामध्ये तब्बल १२४,८६०.०० टक्क्यांची वाढ झाली आहे. पूर्वी कंपनीच्या एका शेअरची किंमत २५ पैसे होती.
1 lakh became almost 12 crores… how?