नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सराफी दुकानातील सेल्समनचे लक्ष विचलीत करीत भामट्या महिलांनी बेनटेक्सच्या ठेवून सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सराफ बाजारात घडलेल्या या घटनेत तब्बल पावणे तीन लाखाच्या बांगड्या लांबविण्यात आल्या आहेत. शोरूममधील सीसीटिव्ही यंत्रणेत हा प्रकार कैद झाल्याने ही चोरी उघडकीस आला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलीक यादव पवार (रा.हिरावाडी,पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार सराफ बाजारातील नामांकित टकले बंधू या शोरूमचे व्यवस्थापक असून ही घटना गेल्या २५ मे रोजी घडली. दुपारच्या सुमारास बुरखाधारी दोन महिला खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात आल्या होत्या. काऊंटरवरील सेल्समन त्या महिलांना सोन्याच्या बांगड्या दाखवत असतांना ही घटना घडली. भामट्या महिलांनी सेल्समनला बोलण्यात गुंतवून ही चोरी केली असून सुमारे २ लाख ८० हजार रूपेय किमतीच्या सोन्याच्या बांगड्या भामट्या महिलांनी लांबविल्या आहेत. सोबत आणलेल्या सोन्यासारख्या दिसणा-या बनावट बांगड्या ठेवून महिलांनी बांगड्या पळविल्या. अधिक तपास पोलीस नाईक थेटे करीत आहेत.