इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शानदार असा विजय मिळवला आहे. इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यांमध्ये शुभमन गिल वगळता आज भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अपयशी ठरले. यावेळी वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावांच्या तगड्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने दोन गडी राखून विजय मिळवला आहे.
सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच मनं जिंकली. अक्षरने नाबाद 64 धावा ठोकत षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्यात ३ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना समोर ३१२ धावांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य भारतासमोर होते. संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण, दोघेही वैयक्तिक अर्धशतक झळकावून दुर्दैवीरित्या बाद झाले.
https://twitter.com/BCCI/status/1551334341414121472?s=20&t=17DnIzX7P3-Kr57LTldEFA
या सामन्यात सुरुवातीला विंडीजनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच कसरत घेतली. त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी कायम ठेवली. सलामीवीर शाय होप आणि कायल मायर्स यांनी दमदार अशी अर्धशतकी भागिदारी केली. 39 धावा करुन मायर्स बाद झाल्यावर एस. ब्रुक्सने देखील 35 धावा ठोकत होपला साथ दिली. ज्यानंतर ब्रँडन किंग शून्यावर बाद झाला.
कर्णधार पूरनने होपसोबत एक बलाढ्य भागिदारी उभारली. पूरन 74 धावा ठोकून तंबूत परतला. पण होपने फटकेबाजी सुरु ठेवली. 115 धावा करुन तो बाद झाला. पण तोवर विंडीजची धावसंख्या 300 पार गेली होती. ज्यामुळे भारताला विजयासाठी 312 धावा करायच्या होत्या. भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 3 तर हुडा, अक्षर आणि चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
विशेष म्हणजे १००व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला. होप १३५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ११५ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर दुसरीकडे अक्षरने सलग दोन चौकार खेचून २७ चेंडूंत वन डेतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या या अर्धशतकात ४ षटकार व ३ चौकारांचा समावेश होता.
https://twitter.com/BCCI/status/1551335862340042752?s=20&t=17DnIzX7P3-Kr57LTldEFA
वन डेतील विंडीजविरुद्धचे भारतीय खेळाडूचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. तसेच अक्षरने षटकार खेचून भारताचा विजय पक्का केला. अक्षरने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६४ धावा करताना भारताला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या दमदार कामगिरीमुळे अक्षरलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
दरम्यान, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली होती. ज्यानंतर आता दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने दोन गडी राखून जिंकला आहे. ज्यामुळे भारताने मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1551448321923108864?s=20&t=17DnIzX7P3-Kr57LTldEFA
India Wins One Day Series Vs West Indies