नवी दिल्ली – सध्या भारतात कोविड -१९ महामारीचा फैलाव सुरू आहे. सुमारे १०२ वर्षांपूर्वी देशामध्ये स्पॅनिश इन्फ्लूएन्झाचा उद्रेक झाला होता, त्याला बॉम्बे फिव्हर असेही म्हणत असत. १९१८ मध्ये स्पॅनिश इन्फ्लूएन्झा या महामारीने जगभरात पाच ते दहा कोटी लोकांना मृत झाले, त्यापैकी वीस टक्के एकट्या भारतातच मरण पावले. त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत देशामध्ये काही प्रमाणात समानता आहे. त्यावेळी लोकांनी ध्यैर्याने या महामारीचा मुकाबला केला होता.
शतकापूर्वी देशातील नागरिक साथीच्या आजाराचा ज्या पद्धतीने मुकाबला केला त्याप्रमाणे आताही नागरिक जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रकारे वाढत आहेत त्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.
भारताने वसुधैव कुटंबकम या भावनेखाली लस मैत्रीची सुरूवात केली आणि ८० हून अधिक देशांना लस पुरविली. भारताच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. भारत सरकारच्या लसी मैत्रीच्या पुढाकाराने लस उत्पादक देशांच्या व्ही -५ क्लबमध्ये देशाचे स्थान सुनिश्चित झाले. आता कोरोना संसर्ग रोखण्याव्यतिरिक्त, देशासमोर अर्थव्यवस्थेची गती कायम राखण्याचे आव्हान आहे.
१९१८ मध्ये भारताने मोठा लढा देऊन जगासमोर आदर्श निर्माण केला होता. तो इतिहास आता पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. इतिहासातून आपण अनेक गोष्टी शिकलो आहोत. १९१८च्या लढ्याद्वारे आपण आताच्याही संकटावर मात करु, असा विश्वास अनेक तज्ज्ञांना वाटतो आहे.