विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
चीनमधील लोकसंख्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारत लवकरच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होऊ शकतो. संयुक्त राष्ट्र संघाचा अंदाज आहे की भारत २०२७ पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल. मात्र चीनमध्ये तज्ज्ञांनी २०२७ पूर्वीच ही वेळ येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जन्मदरात वेगाने घट झाली आहे.
भारताची लोकसंख्या २७.३० कोटींनी वाढेल
संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की २०५० पर्यंत भारताच्या लोकसंख्येत २७.३० कोटींची वाढ होऊ शकते. हा अहवाल २०१९मध्येच आला होता, हे विशेष. २०१९ मध्ये भारताची लोकसंख्या १.३७ अरब तर चीनची लोकसंख्या १.४३ अरब असेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने लावनला होता.
चीन सरकारच्या वतीने अलीकडेच सातव्या राष्ट्रीय जनगणनेचे आकडे जारी केले. त्यानुसार ३१ राज्य, विभाग आणि नगरपालिका मिळून चीनची लोकसंख्या १.४११७८ अरब झालेली आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनचे पहिले स्थान कायम आहे.