इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर आता झिम्बाब्वे मध्ये दाखल होत आहे. तेथे एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यासाठी १५ सदस्यांचा भारतीय संघ भारतीय क्रिकेट नियामक आयोग (बीसीसीआय)ने जाहीर केला आहे. झिम्बाब्वे विरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवनला पुन्हा एकदा कर्णधार करण्यात आले आहे. परंतु या संघातून परत एकदा केएल राहुलला वगळण्यात आले आहे.
विंडिजला 3-0 ने पराभूत केल्यानंतर याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मानस टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा असणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मासह अनुभवी खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. वनडे सीरिजसाठी टीम इंडियात 2 स्टार खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चाहरचे संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते.
राहुल त्रिपाठीला पुन्हा एकदा संधी दिली आहे. टीम इंडियाचा विंडिज दौरा 7 ऑगस्टला संपणार आहे. यानंतर भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. दरम्यान तरुण खेळाडू यात दिसत असताना केएल राहुल मात्र या संघातून बाहेर झालेला दिसत आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी केएल राहुल भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे, परंतु त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे.
वेस्ट इंडिज दौरा संपल्यानंतर टीम इंडिया आता लवकरच झिम्बाबे दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारत या सीरीज मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेआधी ही सीरीज टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. या सीरीजच्या माध्यमातून वेगवान गोलंदाज दीपक चाहर पुनरागमन करतोय.
धवनने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत यशस्वी नेतृत्व केलं. मी भारतासाठी जो पर्यंत खेळेन, तो पर्यंत टीमसाठी उपयुक्त राहीन. मला संघावर ओझ बनायचं नाही, असे शिखर धवन म्हणाला होता.भारताला लवकरच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मात्र, याआधीच संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. हा खेळाडू गेल्या काही काळापासून सतत दुखापतीने त्रस्त आहे. आता त्याचं पुनरागमन अपेक्षित होते, कारण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली.
टीमच्या नेतृत्वाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की, “माझा माझ्या गोलंदाजांवर विश्वास आहे. टॉप लेव्हलवर खेळताना सगळेच व्यावसायिक असतात. सगळ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असते. गोलंदाजांची रणनिती चालली नाही, तर आमच्याकडे दुसरी योजना तयार असते. ही सीरीज आयसीसी पुरुष वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग आहे. पुढच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेत प्रवेश मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. भारताने सन 2016 मध्ये शेवटचा झिम्बाब्वे दौरा केला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीमने तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळले होते.
सामन्याचे वेळापत्रक आणि लाईव्ह स्ट्रिमिंग असे
पहिली वनडे- 18 ऑगस्ट 2022, हरारे,
दुसरी वनडे – 20 ऑगस्ट 2022, हरारे
तिसरी वनडे- 22 ऑगस्ट 2022, हरारे
– भारतीय वेळेनुसार हे तिन्ही सामने दुपारी १२.४५ वाजता सुरू होतील.
– या वनडे सीरीजचे लाइव्ह टेलिकास्ट सोनी नेटवर्क स्पोर्ट्सवर पाहता येईल, तसेच डीडी स्पोर्ट्सवर सुद्धा लाइव्ह ब्रॉडकास्ट केले जाणार आहे. त्याचबरोबर या सीरीजचे लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव या अॅपवरही पाहता येईल.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर
https://twitter.com/Mahesh13657481/status/1557249855340220417?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
India Vs Zimbabwe One Day Series Schedule Details
INDvsZIM Cricket