इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे, रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या बड्या खेळाडूंना १७ सदस्यीय संघात विश्रांती देण्यात आली आहे.
शिखर धवनकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर, रविंद्र जडेजा उपकर्णधार राहणार आहे, संजू सॅमसनचे टी-२० नंतर वनडे आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. शुभमन गिलला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. शुभमनने शेवटची वनडे डिसेंबर २०२१ मध्ये खेळली होती. दीपक हुडाला निवडकर्त्यांनी पुन्हा संधी दिली आहे. आंतरराष्ट्रीय T20 मधील चांगल्या कामगिरीनंतर त्याची वनडे संघात निवड करण्यात आली आहे. मोहम्मद सिराजचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तर, अर्शदीपला टी-२० नंतर वनडे संघातही स्थान मिळाले आहे.
India Vs West Indies ODI Match Series Indian Team Players