मुंबई – दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक आयोगाने (बीसीसीआय) केली आहे. कर्णधार रोहित शर्मा सध्या जायबंदी आहे. त्यामुळे त्याच्या जागी के एल राहुलकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. बीसीसीआयने १८ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
भारतीय संघ असा
केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेट किपर), इशान किशन (विकेट किपर), यजुवेंद्र चहल, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
https://twitter.com/BCCI/status/1476932067703156744?s=20
१९ ते २३ जानेवारी दरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. सध्या भारतीय संघ कसोटी सामन्यांची मालिका अफ्रिकेत खेळत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका त्यानंतर होणार आहे.