इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या सामना सुरू आहे. विश्वचषकातील हा ३५ वा सामना अॅडलेडमध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेश समोर १८५ धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामीवीर के एल राहुलने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. दमदार ६४ धावा करीत विराट कोहली तो नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने ३० धावा केल्या. भारतीय संघाने २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आला आहे. बांगलादेशकडून सौम्या सरकारच्या जागी शोरफुल इस्लामला संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. दीपक हुडा या सामन्यात खेळत नाहीये.
उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचतील आणि उपांत्य फेरीच्या जवळ जाईल. दुसरीकडे, बांगलादेश जिंकल्यास उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदारही ठरेल आणि भारताचा ताण वाढेल.
Innings Break!
A solid show with the bat from #TeamIndia! ? ?
6⃣4⃣* for @imVkohli
5⃣0⃣ for vice-captain @klrahulOver to our bowlers now! ? ?
Scorecard ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ#T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/n6VchSoP7v
— BCCI (@BCCI) November 2, 2022
India vs Bangladesh T20 World Cup Match