इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अतिशय उत्कंठावर्धक ठरला. विश्वचषकातील हा ३५ वा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेश समोर १८५ धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर बागलादेशने त्यांचा डाव सुरू केला. बांगलादेश संघाने ७ षटकात ६६ धावा केल्या असतानाच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सामना थांबविण्यात आला. त्यानंतर पाऊस बंद झाला. अखेर बांगलादेशला १६ षटकात १५१ धावा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. अखेर भारताने शेवटच्या षटकात सामना फिरविला आणि तो जिंकला. भारताने बांगलादेशवर ५ धावांनी रोमहर्षक विजय प्राप्त केला.
भारताने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर के एल राहुलने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. दमदार ६४ धावा करीत विराट कोहली तो नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने ३० धावा केल्या. भारतीय संघाने २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. आता बांगलादेश १८५ धावांचा सामना करीत असतानाच पावसाचे आगमन झाले आहे. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. सद्यस्थिती डकवर्थ लुईस नियमानुसार, बांगलादेशचे पारडे जड झाले. कारण या नियमाअंतर्गत बांलगादेशचा संघ १७ धावांनी पुढे आहे. त्यानंतर पाऊस बंद झाला आणि नव्या उद्दीष्टासह बांगलादेशचे खेळाडू मैदानात उतरले. पण, बांगलादेशला लक्ष्य गाठता आले नाही. त्यांनी १४५ धावाच केल्या.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आला आहे. बांगलादेशकडून सौम्या सरकारच्या जागी शोरफुल इस्लामला संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेलचे भारतीय संघात पुनरागमन झाले. दीपक हुडा ला संधी देण्यात आली नाही.
उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर होता, तर बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. भारताने हा सामना जिंकून गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत जाण्याचे जवळपास निश्चित आहे.
https://twitter.com/ICC/status/1587777926400991232?s=20&t=WNLec63UX9yhuoMLaaK4Og
India vs Bangladesh T20 World Cup Match