इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय पोस्टाची आरडी ही एक लोकप्रिय सेव्हींग स्कीम आहे. सरकारने आवर्ती ठेव योजनेसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी जैसे थे ठेवले. एरव्ही दर तीन महिन्यांनी छोट्या बचत योजनांमधील व्याजदरांमध्ये बदल केले जातात. आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IIPB) अॅपच्या माध्यमातून तुम्ही आरडीमध्ये थेट पैसे जमा करू शकता. आरडीचा मासिक हफ्ताही थेट अॅपच्या माध्यमातून जमा होऊ शकतो.
कसे ट्रान्सफर करायचे पैसे
१. आपल्या बँकेच्या खात्याला आयपीपीबी खात्यात पैसे टाका
२. डीओपी प्रॉडक्टमध्ये जाऊन आरडी सिलेक्ट करा
३. आरडी अकाऊंट नंबर आणि डीओपी ग्राहक क्रमांक टाका
४. हफ्त्याचा कालावधी आणि रक्कम निवडा
५. अॅपवरून आपल्याला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी मागितली जाईल
पाच वर्षांच्या आरडीचे व्याजदर
सरकारने पीपीएफ आणि एनएससीसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. मंत्रालयातून निघालेल्या एका अधिसूचनेत हे स्पष्ट करण्यात आले आहे. पाच वर्षांच्या टर्म डिपॉझीटवर ५.५ ते ६.७ टक्के व्याज मिळेल. ते दर तीन महिन्यांनी मिळेल. सरकारने डाक पे डिजीटल पेमेंट अॅपही लॉन्च केले आहे. त्याचा वापरही ग्राहकांना करता येणार आहे.