पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया पोस्ट (GDS ) भरती 2022 अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड, झारखंड आणि भारतीय टपाल विभागाच्या इतर मंडळांमध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या सुमारे 39,000 पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. आहेत.
इंडिया पोस्ट GDS भरती 2022 साठी उमेदवारी अर्ज अधिकृत GDS पोर्टल, indiapostgdsonline.gov.in वर केले जाऊ शकतात. तथापि, अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पोस्ट विभागाद्वारे जारी केलेल्या ग्रामीण डाक सेवक भरती जाहिरातीचे सर्व तपशील काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.
टपाल विभाग भरती किंवा ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट. पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालय, भारत सरकार, यांनी दि. 2 मे 2022 रोजी देशभरातील विविध राज्यांमध्ये स्थित मुख्य पोस्ट ऑफिस आणि इतर पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवून जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी (मॅट्रिक किंवा हायस्कूल किंवा माध्यमिक ) परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत भर्ती पोर्टलला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे.
पोस्ट विभागातील ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी उमेदवारांची निवड चाचणी किंवा मुलाखतीच्या आधारे केली जाईल. देशभरातील टपाल विभागाच्या विविध मंडळांनुसार उमेदवारांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीनुसार, उमेदवारांना संबंधित पोस्टल सर्कलने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणीसाठी आमंत्रित केले जाईल.
पोस्ट विभागातील ग्रामीण डाक सेवक पदांसाठी, उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा तसेच अर्जाच्या पोस्टल सर्कलसाठी विहित केलेल्या प्रादेशिक भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्या भाषेत लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे. याव्यतिरिक्त, उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे, हे वय अर्जाच्या शेवटच्या तारखेपासून मोजले जाईल. भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.