नवी दिल्ली – सध्याच्या काळात प्रत्येक तरुणास शासकीय नोकरीची अपेक्षा असते बेरोजगार तरुणांसाठी टपाल विभागात सध्या चांगली संधी आहे. टपाल खात्यात ग्रामीण डाक सेवकाची नोकरी हवी असणाऱ्यासाठी केरळ पोस्टल सर्कल अंतर्गत विविध पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या एकूण १४२१ पदांच्या भरतीसाठी इंडियन पोस्टने अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.
केरळ पोस्ट सर्कलमध्ये टपाल खात्याने जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, ग्रामीण डाक सेवक भर्ती पोर्टल, पोस्ट.इन. वर ऑनलाईन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची विंडो १५ एप्रिल रोजी पुन्हा उघडली आहे आणि २१ एप्रिल पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या भरतीसाठी विहित पात्रता मान्यताप्राप्त मंडळाकडून कोणत्याही भाषेत दहावी उत्तीर्ण झालेली असावी.
उमेदवारांनी दहावीच्या वर्गात संबंधित राज्य परिक्षा मंडळाची अधिकृत भाषा एक विषय म्हणून वाचली पाहिजे. याव्यतिरिक्त ८ मार्च रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राज्यातील आरक्षित विभाग म्हणजे एससी, एसटी, ओबीसी आणि इतर वर्गाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भरती सूचना पहावी. ग्रामीण डाक सेवक पदांच्या अर्जाच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्पे आहेत – नोंदणी करणे , अर्ज फी भरणे आणि अर्ज सादर करावा लागणे. याकरिता उमेदवारांना जीडीएस पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि नंतर स्टेज १ नोंदणीसाठी असलेल्या लींकवर क्लिक करावे लागेल आणि नोंदणी पृष्ठावर जावे लागेल, जेथे उमेदवारांनी मागितलेला तपशील भरून स्टेज १ पूर्ण करू शकेल. यानंतर, वाटप केलेल्या नोंदणी क्रमांकासह स्टेज २ वर जाण्यासाठी, अर्ज फी १०० रुपये ऑनलाइन भरून द्यावी लागेल. यानंतर अंतिम टप्प्यातील तिसर्या टप्प्यात उमेदवारांना नोंदणी क्रमांकावरून लॉग इन करून अर्ज भरावा लागेल.