नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी), एअरटेलच्या सहकार्याने आज नवी दिल्ली येथे आयपीपीबीच्या ग्राहकांसाठी व्हॉटस् अॅप बँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या बँकिंग सेवेमुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनच्या माध्यमातून बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल.
नव्याने सुरु करण्यात आलेल्या आयपीपीबी व्हॉटस् अॅप बँकिंग सेवेद्वारे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना व्हॉटस् अॅप वरून बँकेशी जोडले जाता येईल आणि घरपर्यंत सेवा विनंती, जवळचे टपाल कार्यालय शोधणे आणि अनेक सेवांसह बँकिंग सेवांचा सहजतेने लाभ घेता येईल.
डिजिटल आणि आर्थिक समावेशकता आणण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षेनुसार नागरिकांना त्यांच्या भाषेत सेवा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने, एअरटेल – आयपीपीबी व्हॉट्सअॅप बँकिंग उपाय बहु-भाषा समर्थन तयार करण्यासाठी कार्यरत आहे, ज्यामुळे ग्राहकांना, विशेषत: देशाच्या ग्रामीण भागात असलेल्या लोकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त सुविधा प्रदान करण्यात येत आहे.
बँकेच्या निमशहरी आणि श्रेणी 2,3 शहरांमधल्या ग्राहकांना दरमहा सुमारे 250 दशलक्ष संदेश प्रसारित करण्यासाठी एअरटेल सोबत काम करत आहे. व्हॉट्सअॅप मेसेजिंगच्या जोडणीमुळे ग्राहकांना त्यांना बोटाच्या एका क्लिकवर बँकेशी जोडण्यासाठी सुलभता वाढेल, सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाला प्रोत्साहन देण्याचा एक भाग म्हणून आयपीपीबी देशाच्या ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.
Bank at your convenience. With @IPPBOnline Doorstep banking services, no need to step out of your home for banking. Place your service request at https://t.co/SuwDfR4L22#Aapkabankaapkedwaar #Bankingatlastmile (1/2) pic.twitter.com/VRkujxG6HZ
— India Post Payments Bank (@IPPBOnline) March 31, 2023
India Post Payment Bank WhatsApp Banking Service