नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लवकरच होऊ घातलेल्या आशिया चषक आणि त्यातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरं तर ती एक मोठी अटच आहे. तीच आता समोर आली आहे.
यावर्षी एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष नजम सेठी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांना एक अट घातली आहे. आम्ही आमचा संघ आता भारतात पाठवू पण, २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ पाकिस्तानात येईल.
यावर्षी ५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी, BCCI ने अहमदाबाद (भारत विरुद्धचा सामना), चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांना पाकिस्तानच्या सामन्यांसाठी संभाव्य यजमान म्हणून निवडले आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखालील ACC (एशियन क्रिकेट कौन्सिल) ने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी प्रस्तावित ‘हायब्रीड मॉडेल’ला मान्यता दिली नाही. ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये, भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल, तर पाकिस्तान इतर सामने आयोजित करेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नजम सेठी ८ मे रोजी दुबईला रवाना होणार आहेत, जिथे ते ACC आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. पीसीबीच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय आणि आयसीसी सहमत होईपर्यंत पाकिस्तानचे विश्वचषक सामने भारतात खेळणार नाही. या पाकिस्तानच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू करण्याची अपेक्षा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची लेखी हमी हवी आहे.
सूत्राने सांगितले की, नजम सेठी यांनी अलीकडेच काही सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांचा सल्लाही घेतला की, पीसीबीने त्यांच्या हायब्रीड मॉडेल योजनेअंतर्गत एसीसीला सुचविले आहे की, आशिया कप लाहोर आणि दुबई येथे आयोजित केला नाही तर पाकिस्तानने आशियामध्ये खेळावे का? ते म्हणाले की, सप्टेंबरमध्ये आशिया चषक आयोजित करण्याबाबत एसीसी सदस्यांना ठोस आणि स्पष्ट भूमिका देण्यासाठी सेठी यांना सरकारकडून संमती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेठी यांनी एसीसी सदस्यांना हे स्पष्ट करणे अपेक्षित आहे की, एकतर त्यांनी पाकिस्तानचा हायब्रीड प्रस्ताव स्वीकारला किंवा टूर्नामेंट पाकिस्तानमधून बाहेर काढली तर पीसीबी यावर्षी स्पर्धेत भाग घेणार नाही. पीसीबी अध्यक्ष आशिया कपच्या वेळापत्रकात आणखी विलंब स्वीकारण्यास तयार नाहीत. नजम सेठी यांना आता हे समजले आहे की, काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे आणि आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण आणि वेळापत्रक निश्चित करण्यात एसीसीकडून आणखी विलंब स्वीकारण्यास ते तयार नाहीत. आशिया चषकाचे सामने पाकिस्तानात न झाल्यास पाकिस्तान संघ आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही, अशी सेठी यांची भूमिका आता स्पष्ट झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
India Pakistan Match Asia Cup PCB Demand