विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पाकिस्तानच्या मनात कधी काय येईल, याचा काही नेम नसतो. सीमेवर सतत काहीतरी गडबड करण्याच्या तयारीत पाकिस्तानचे सैन्य असते. सैन्याने गडबड नाही की तर पाकिस्तानने पोसलेले दशहतवादी घुसखोरी करतात. पण सतत हालचाली सुरू असतात. आता पाकिस्तानचे सेना प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी आपल्या जवानांना भारताच्या तसेच अफगाणिस्तानच्या सीमेवर अॅलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
भारत–पाक सीमा व पाकिस्तान–अफगाणिस्तान सीमा या दोन्ही ठिकाणी पूर्ण सतर्कता पाळण्याचे आदेश बाजवा यांनी दिले आहेत. सेनेचे सर्व कमांडर व अधिकारी यांनी रावळपिंडीतील सैन्य मुख्यालयात दोन दिवस बैठक झाली. यात सीमांवरील आधुनिकीकरणासोबतच पायाभूत सुविधा वाढविण्यावर विचार करण्यात आला, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
सेनेच्या इंटर–सर्व्हिस पब्लिक रिलेशन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ‘पाकिस्तानपुढे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात सद्यस्थितीत असलेल्या आव्हानांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या सीमांवर सेनेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या महिन्यात अफगाणीस्तान सीमेवर फायरिंग आणि बॉम्बहल्ले झाले होते. अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांची आता पाकिस्तानलाच भिती वाटायला लागली आहे, ही देखील आश्चर्याचीच बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजवा यांनी आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अफगाणीस्तानला लागून असलेल्या सीमांवर पूर्ण तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी फॉर्मेशन कमांडर संमेलन पाकिस्तानात घेण्यात आले होते. त्यात बाजवा यांना अफगाण शांती प्रक्रियेसाठी पाकिस्तानचे समर्थन आणि सीमा सुरक्षा वाढविण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. या बैठकीत कमांडर, चीफ स्टाफ आफिसर्स आणि इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
भारत–चीन सीमेवरही तणाव
भारत–चीन सीमेवर सतत तणाव सुरू असल्यामुळे भारतीय सेनेचे सर्व कमांडर यांची बैठक सुरू आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या या बैठकीत चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील धोका लक्षात आणून देण्याचा उद्देश आहे. पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजारी देशांमुळे कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलण्याची तयारी भारताने ठेवली आहे.