इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजू फातिमा बनल्यानंतर आता तिला पाकिस्तानमधून वेगवेगळ्या प्रकराच्या भेट वस्तू मिळत आहे. पाक स्टार ग्रुपच्या कंपन्यांचे सीईओ मोहसीन खान अब्बासी यांनी अंजूला तिच्या निवासस्थानी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला ५० हजार रुपयांचा धनादेश, एक गृहनिर्माण भूखंड आणि इतर मौल्यवान भेटवस्तू भेट दिल्या. त्याचप्रमाणे सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर घर बसल्या पगार देण्याची घोषणा केली. पाकिस्तानी व्यावसायिकाने अंजू-नसरुल्लाला भेटवस्तू दिल्याचा हा व्हिडिओ रविंदर सिंग रॉबिन या पत्रकाराने ट्विटरवर शेअर केला आहे.
राजस्थानच्या अलवरमधील रहिवासी असलेल्या अंजूचे आधीच अरविंदशी लग्न झाले आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत, एक १५ वर्षांची मुलगी आणि एक ६ वर्षांचा मुलगा. असे असतांना अंजून धर्म तर बदललाच पण नावही बदलले, भारतातील अंजू पाकिस्तानात जाऊन फातिमा बनली आहे. तिने धर्म परिवर्तन करून इस्लाम धर्म स्वीकारला असून मित्र नसरुल्लाहशी निकाह केला आहे. खरं तर व्हिसा घेऊन अंजू पाकिस्तानात गेली तेव्हा आपण केवळ फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी गेल्याचे तिने सांगितले होते. आणि काही दिवसातच ती भारतात परत येईल. असे सांगितले. पण, आता तीने निकाह केल्याचे स्पष्ट झाले असून ती तेथेच राहणार आहे. अंजूने यापूर्वीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
लग्न झाल्यानंतर केला व्हिडीओ शेअर
निकाह झाल्यानंतर दोघांनी ‘अंजू वेड्स नसरुल्ला’ नावाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते दोघेही एका डोंगरावर आहेत. दोघांनी वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले. त्यामध्ये तिने पाकिस्तानमध्ये सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. अंजूला पाकिस्तानात धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. वास्तविक, नसरुल्लाने सोमवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अंजू केवळ पाकिस्तान फिरायला आली आहे. त्यांच्यात केवळ मैत्री आहे. दोघांचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. असे सांगणाऱ्या नसरुल्लाने अंजूशी निकाह केल्याचे समोर आले आहे.