वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान आतापर्यंत तीन मोठे युद्ध झाले असून, सीमेवर छोट्यामोठ्या चकमकी सुरूच असतात. मोठ्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. लष्करी सामर्थ्यासह इतर बाबतीत भारत नेहमीच वरचढ ठरत आला आहे. सध्या दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी असली तरी येत्या २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक मोठे युद्ध होण्याची शक्यता असलेला अहवाल अमेरिकेची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने त्यांचा ग्लोबल ट्रेन्डस रिपोर्ट अमेरिकेच्या सरकारकडे दिला आहे. हा अहवाल सगळेच देश गंभीरतेने घेत असल्यामुळे त्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावे लागेल.
फाइव्ह इयर रिजनल आउटलूक रिपोर्ट-साउथ एशिया या अहवालात दक्षिण आशिया प्रदेशामध्ये अस्थिरता येणार असून अशांतताही पसरणार असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात भारत-पाकिस्तानदरम्यान मोठे युद्ध होण्याची शक्यता असून हे युद्ध अनेक दिवस चालणार आहे. या युद्धात दोन्ही देशांच्या सैनिकांना बलिदान द्यावे लागणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये या अहवालाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अहवालावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र भरतात याची कोणतीच चर्चा नाही. पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र डॉनने ९ एप्रिलला यावर सविस्तर बातमी छापली आहे. तर भारतात फ्रंटलाईन या मॅगझिनने १० एप्रिलला अहवालावर लेख प्रसिद्ध झाला आहे.
आगामी पाच वर्षांच्या काळात भारतात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ला करेल. त्याचे रूपांतर युद्धात होईल, असे नमूद करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे आगामी काळातही भारत अशा हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
भविष्यात होणार्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोर पाकिस्तानशी संबंधित असतील. त्यामुळे आधी केलेल्या कारवाईप्रमाणेच तेव्हाही पाकिस् तानला प्रत्युत्तर देण्याचा दबाव भारत सरकारवर असेल. त्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीत दोन्ही देशात युद्ध होईल, असे अहवालात म्हटले आहे.










