नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पहायला मिळाली. त्यानंतरही काही राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मोदींचा करिष्मा चालला. बंगाल, दिल्ली आणि अन्य काही राज्यात मात्र वेगळे चित्र होते. आणखी दोन वर्षांनी लोकसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी देशाच्या राजकारणाचा मूड मात्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. देशव्यापी एका सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट होत आहे. आम आदमी पक्षाला चांगले दिवस असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. चला, बघू या सर्वेक्षण काय सांगते आहे…
असे म्हटले जाते की, भारतातील कोणताही नागरिक हा राजकारणाशिवाय राहू शकत नाही, कारण जनमानसावर राजकारणाचा पगडा असतो. अगदी देशाच्या वरिष्ठ वरिष्ठापासून तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण राजकारणावर भाष्य करत असतो. परंतु देशांमध्ये कोणते पक्ष असे आहेत याची नेहमी चर्चा होत असते, सध्या नेमकी काय स्थिती आहे. या संदर्भात काही निष्कर्ष निघाले आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्राची राजकीय सत्ता प्राप्त करून घेऊन ती वापरण्याच्या उद्देशाने संघटित झालेल्या राष्ट्रातील नागरिकांचा समुदाय. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ८ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) पक्ष आहेत.
विशेष म्हणजे भारतात २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात.भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.
तर जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे. तर मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे. मात्र सध्या गेल्या काही काळापासून बंडखोरीमुळे अडचणीत असलेल्या काँग्रेससाठी आणखी एक स्थिती दिसत आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस पक्ष त्याच्या इतिहासातील वाईट काळातून जात आहे. पक्षाचा जनाधार कमी होताना दिसतो आहे.
दुसरीकडे आम आदमी पार्टी हा अरविंद केजरीवाल यांचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर गतीने विस्तारताना दिसतो आहे. भाजपाचा विचार केला तर त्यांच्या पाठिराख्यांची संख्या स्थिर असल्याचे दिसते आहे, असे सर्व चित्र समोर आले आहे, मिंट-सीपीआर मिलेनियम सर्वेमध्ये. या सर्वेक्षणातून शहरातील मतदारांच्या मनात काय आहे, हे जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्वेमुळे काँग्रेसची चिंता वाढण्याची आणि आपचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. या सर्वेनुसार, भाजपाचा शहरी भागातील मतदार स्थिर आहे दुसरीकडे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर आम आदमी पार्टी राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधकाची पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात दिसते आहे.
महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचा तर त्यांचा जनाधार कमी होताना दिसतो आहे. सर्वेतील 36 टक्के सहभागी जनतेने भाजपा ही पहिली निवड असल्याचे सांगितले आहे. नोव्हेंबर डिसेंबर 2021 साली गेल्या गेलेलया सर्वेमध्ये भाजपाला 38 टक्के जणांचा पाठिंबा होता. शहरांत, तरुणांत आणि पुरुषांमध्ये भाजपाचा पाठिंबा कमी झालेला दिसतो आहे. काँग्रेसला यंदा 9 टक्के जणांची पसंती आहे.
गेल्या वर्षी हा आकडा 11 टक्के होता. आपचा ग्राफ वाढता दिसतो आहे. गेल्यावर्षी त्यांना 1 टक्के जनतेचा पाठिंबा होता, तो यंदा वाढून 7 टक्क्यांवर पोहचला आहे. सर्वेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा वाढताना दिसतो आहे. गेल्यावर्षी 16 टक्के जनतेने प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दर्शवला होता, तो आकडा आता वाढून 20 टक्के झाला आहे.
वास्तविक राजकीय पक्षांना त्यांच्या सामर्थ्याच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, याकरिता राज्यघटनेत किंवा संविधानात सोय असलीतर बहुपक्षीयपद्धती वाढीस लागू शकते. अशा बहुपक्षपद्धतीत कोणताच एक राजकीय पक्ष बहुमताच्या जोरावर सत्ता काबीज करू शकत नाही, अशा वेळी निरनिराळ्या पक्षांची आघाडी मुदत संपेपर्यंत टिकून राहतेच, असे नाही. आघाडीचे घटक पक्ष किती शिस्तबद्ध आहेत, याच्यावर हे अवलंबून असते.
ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म YouGov, मिंट आणि दिल्लीतील थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च यांनी एकत्रित हे सर्वेक्षण केले. दर सहा महिन्यांनी करण्यात येत असलेल्या या सर्वेक्षणाची ही आठवी वेळ आहे. सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. या सर्व्हेत देशातील 204 शहरांतील 10271 जणांनी सहभाग नोंदवला.
या सर्व्हेतून भारतीयांच्या अपेक्षा, चिंता आणि राजकीय कल जोखण्यात सर्वेतील 28 टक्के जणांनी कोणताही पक्ष हा पहिली पसंद नसल्याचे सांगितले. गेल्या वेळी हा आकडा 34 टक्के होता. या उदासीन असणाऱ्या मतदारांना आपने आकर्षित केल्याचे दिसते आहे. आपच्या पंजाबच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या या मतदारांचे लक्ष आता गुजरात, हिमाचलच्या निवडणुकांकडे असणार आहे.
आपची लोकप्रियता उ. भारतात 13 टक्के तर पश्चिम भारतात 7 टक्के आहे. दक्षिणेत पक्षाला मेहनत घ्यावी लागणार आहे. भजापाच्या विरोधात कुणाला पसंती द्याल, त्यात 31 टक्के जणांनी आपसारख्या नव्या पर्यायाचे नाव घेतले. तर 19 टक्के जनतेलाच असे वाटते आहे की, भाजपाला काऊंटर करण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे. तर 21 टक्के जणांना वाटते आहे की, प्रादेशिक पक्ष भाजपाला रोखू शकतील. परंतु येणारा काळच याबाबत निश्चित ठरवेल असे दिसून येते.
India National Survey Politics AAP BJP
Congress Political Party Citizens Voter