नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी वर्ग कोलमडून पडला आहे, कारण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. जणू काही पावसाळा असल्याचे चित्र आणि ठिकाणी दिसत असून यंदा पावसाळ्यात मात्र पुरेसा पाऊस पडतो की नाही? याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा ६ टक्के पाऊस कमी पडणार असल्याने केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच चिंतेत टाकणारी ही बातमी आहे. परंतु घाबरून जाण्याची कारण नाही कारण अद्याप भारतीय हवामान खात्याचा अंदाज येणे बाकी आहे.
स्कायमेट या खासगी संस्थेकडून यंदाचा देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत केवळ ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांच्या म्हणण्यानुसार, अलनिनोचा प्रभाव भारतीय मान्सुनवर होऊ शकतो. देशातील अनेक भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखीन भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाचे म्हणजे या प्राथमिक अंदाजानंतर स्कायमेट पुन्हा मान्सूनचा अंदाज देणार आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभाग आपला अंदाज १५ एप्रिलला वर्तवणार असून त्यानंतरच पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत थोडा अंदाज येईल. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभागाचा एक अंदाज येतो, त्यानंतर यावर्षीच्या पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत नेमकी याबाबत माहिती समोर येईल, असे सांगण्यात येते.
अल निनोशिवाय मान्सूनवर परिणाम करणारे इतरही घटक आहेत. हिंद महासागर द्विध्रुव मध्ये मान्सून मध्यम करण्याची क्षमता आहे आणि जर तो पुरेसा असेल तर अल निनोचे दुष्परिणाम नाकारू शकतात. स्कायमेटनुसार देशाच्या उत्तर आणि मध्य भागांना पावसाच्या कमतरतेचा धोका असल्याची अपेक्षा आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. उत्तर भारतातील कृषी क्षेत्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे स्कायमेट वेदर ही सन २००३ मध्ये स्थापन झाली असून भारतातील सर्वात मोठी हवामान अंदाज आणि कृषी संदर्भात इशारा देऊन उपाय सांगणारी कंपनी आहे. गेल्या २० वर्षांपासूून सातत्याने विश्वसनीय आणि अचूक हवामान अंदाज प्रदान करण्यासाठी ओळखली जाते. एल निनो व्यतिरिक्त, मान्सूनवर परिणाम करणारे इतर घटकदेखील आहेत. हिंदी महासागराचा द्विध्रुव जेव्हा पुरेसा मजबूत असतो तेव्हा त्यामध्ये (आयओडी) मान्सूनला चालना देण्याची आणि एल निनोचे दुष्परिणाम नाकारण्याची क्षमता आहे.
सध्या आयओडी तटस्थ आहे आणि मान्सूनच्या सुरुवातीला ते मॉडरेटली पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. हंगामाच्या उत्तरार्धात हे वितरण अधिक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागांना पावसाची कमतरता असण्याचा धोका स्कायमेटला जाणवत आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सूनच्या मुख्य महिन्यांत अपुरा पाऊस पडेल. महाराष्ट्रात या कालावधीमध्ये जोरदार पाऊस असतो. त्याच कालावधीत यंदा कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केलाय. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मान्सूनच्या दुसऱ्या भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
India Monsoon Skymet Forecast Rainfall Prediction