– दोन दिवसीय एक्झिबिशनचे दिमाखात उदघाटन
– एकाच छताखाली पर्यटनाचे अनेक पर्याय
नाशिक- इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स एक्झिबिशन(आईआईटीई) चे हॉटेल एमराल्ड पार्क येथील पंचम सभागृहात उदघाटन करण्यात आले. यावेळी इंडिया दर्पण लाईव्ह शी आईआईटीई चे व्यवस्थापक अनुराग गुप्ता यांनी बोलताना सांगितले की,प्रदर्शनात अनेक राज्यांच्या पर्यटन मंडळासह खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे स्टॉल लागले आहेत.
पर्यटनास इच्छुक असणाऱ्यांना विविध राज्यातील तसेच दुबई, थायलंड व देशातील उत्कृष्ट पर्यटन स्थळांवर निवास भोजन व आदी व्यवस्थेसंदर्भात माहिती मिळते आहे. ते म्हणाले की, पर्यटन व्यवसाय हा या मोसमात तेजीत असणारा व्यवसाय आहे आणि या मोसमात अनेक पर्यटक पर्यटन यात्रा करत असतात पर्यटन म्हणजे निव्वळ फिरणे नसून मानसिक शांती मिळण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम आहे.
अशा पर्यटकांसाठी प्रदर्शनात एका छताखाली पर्यटनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहे दोन दिवस चालणारे प्रदर्शन २४ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११:३० ते सायंकाळी ७:३० पर्यंत सुरु असणार आहे. या प्रदर्शनात केंद्रीय पर्यटन विभागासह महाराष्ट्र गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळच्या पर्यटन विकास महामंडळाचे स्टॉल आहेत थॉमस कुक,गुजरात पर्यटन, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, महिंद्रा हॉलिडेज चे स्टॉल सुद्धा येथे आहेत. भारतात पर्यटन स्थळांची कमतरता नसल्याने गुजरात तसेच इतर राज्यातील सर्वच पर्यटन क्षेत्रांची माहिती या प्रदर्शनात होत आहे.