इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत हा लोकशाही प्रणाली असलेला शांततावादी देश आहे, याउलट पाकिस्तान मध्ये कायमचा अशांतता दिसून येते, इतकेच नव्हे तर अनेक दहशतवादी संघटनांना पाकिस्तानमध्ये आश्रय देण्यात येतो, दहशतवादाची पाळेमुळे देखील या देशात खोलवर रुजली आहेत, याचा वारंवार प्रत्यय येतो. या संदर्भात भारताने जागतिक व्यासपीठावर आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. तसेच पाकिस्तान सरकार हे दहशतवादाला पाठीशी घालत असल्याबद्दल खडसावले देखील आहे, आता देखील त्याचा नुकताच प्रत्यय आला
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा त्याचा खरा चेहरा दाखवला आहे. लष्करी संघर्षां दरम्यान नागरिकांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर आयोजित कार्यक्रमात भारताने पाकिस्तानवर कडक ताशेरे ओढले आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनमधील मुत्सद्दी आर. मधुसूदन यांनी जागतिक मंचावर सांगितले की, पाकिस्तानचा दहशतवादाला खतपाणी घालण्याचा इतिहास आहे. जगात कुठेही दहशतवादी घटना घडली तर त्याचे मूळ कुठेतरी पाकिस्तानात सापडते. एवढेच नाही तर दहशतवादी ओसामा बिन लादेनही पाकिस्तानात सापडल्याचे त्यांनी सांगितले.
मधुसूधन पुढे म्हणाले की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर करून भारतावर खोटे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या उलट पाकिस्तानला दहशतवादाला आश्रय देण्याचा इतिहास आहे. जगभर पसरलेल्या दहशतवादाचे मूळ कुठेतरी पाकिस्तानात आहे. जगातील कुप्रसिद्ध आतंकवादी तथा दहशतवादी ओसामा बिन लादेनसह अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे. येथे नागरी सुरक्षेबद्दल बोलायचे तर सर्वात मोठा धोका दहशतवादाचा आहे, तसेच पाकिस्तानचा संबंध हा काही वर्षापूर्वी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याशी आहे. निष्पाप नागरिकांवरील हल्ल्याचे हे सर्वात मोठे भयानक उदाहरण होते. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया संपूर्ण जगाला माहीत झाल्या आहेत, असेही मधुसूदन यांनी यावेळी स्पष्ट केले.