इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या आठ दिवसात पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मिळून एकूण सुमारे 140 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून जनावरे देखील वाहून गेली आहेत. नदी नाल्यांना पूर आल्याने धरण साठ्यात मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याने आणखी चार दिवस रेड अलर्ट तथा पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हवामान विभागानं ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढचे 72 तास गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यासाठी महत्वाचे आहेत. कारण या ठिकाणी मुसळदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेती पिकांचेही मोठे नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळं राज्यात आत्तापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरामध्ये या स्थितीमुळे आत्तापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जनावरे दगावले असून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशाराही दिला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे राज्यात आत्तापर्यंत ८३८ घरांचे नुकसान झाले असून पाच हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. पूरग्रस्तांसाठी राज्यात ३५ ठिकाणी मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे १२५ जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने किमान १३० गावे बाधित झाली असून २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील १२८ गावांचा संपर्क तुटला आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे आणि आसना नदीच्या काठावर वसलेल्या शेजारील नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच महाराष्ट्रात १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यादरम्यान लोकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही दिलासादायक बाब आहे की, आतापर्यंत या ठिकाणाहून जीवितहानी झालेली नाही. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रातील कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. छोटा उदयपूर आणि नर्मदा जिल्ह्यांत नद्यांना उधाण आले आहे. गुजरातमधील नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांतील 700 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्याचवेळी छोटा उदयपूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळला. गुजरातमधील तापी जिल्ह्यातील पांचोल आणि कुंभिया गावांना जोडणारा पूल पावसाच्या सरीने वाहून गेला. त्याचबरोबर दक्षिण गुजरातमधील अनेक भागात नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे.
पाऊस आणि पुरामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे. इकडे अहमदाबादमध्ये पावसामुळे वाईट स्थिती आहे. सर्वत्र पाणी तुंबले आहे. त्यामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या 13 आणि एसडीआरएफच्या 16 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आणि मध्य गुजरातमधील 388 रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत.
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती घेतली. केंद्र सरकार परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफसह (NDRF) सर्व आवश्यक मदत करणार आहे. त्याचवेळी दक्षिण आणि मध्य गुजरातच्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. या भागातून सुमारे 1,500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
India Heavy Rainfall Maharashtra Gujrat 140 death