इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात अनेक ठिकाणी मुसळधार सुरू झाला असून उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. राजधानी दिल्लीत पावसानंतर तापमानात घट झाली आहे. त्याचबरोबर देशात यंदाच्या उन्हाने सर्व विक्रम मोडीत काढले होते. तर दुसरीकडे जगातील अनेक देश उष्णतेशी झुंज देत आहेत. या देशांमध्ये आता ब्रिटनचे नाव आघाडीवर आहे. ब्रिटनमध्ये प्रथमच 40 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विलक्षण उष्णतेसाठी हवामान खात्याने प्रथमच रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्याच्या सुरुवातीला इंग्लंडच्या मोठ्या भागात कमालीची उष्णतेची शक्यता आहे. स्पेन आणि फ्रान्स प्रमाणे वाढत्या तापमानाचा परिणाम ब्रिटनमध्येही जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे ब्रिटनमध्ये राष्ट्रीय उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. कडक उन्हाचा सामना करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि स्पेनमध्ये कडक उन्हामुळे ही परिस्थिती आली आहे. मध्य स्पेनमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्समध्येही तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.
चीनमधील अनेक शहरांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी लोकांनी भूमिगत आश्रयस्थानांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. चीनी हवामान खात्याने चीनच्या 68 शहरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यात शांघाय, नानजिंगचाही समावेश आहे. रेड अलर्ट ही तिसऱ्या टप्प्याच्या उष्णतेची चेतावणी आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या शहरांतील तापमान पुढील २४ तासांत ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. शांघायमध्ये, सुमारे 25 दशलक्ष नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा फटका सहन करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. सन 1873 मध्ये शांघायमधील तापमान 15 दिवसांसाठी 40 डिग्री सेल्सियसच्या वर गेले होते . चीनच्या विविध शहरांमध्ये, जिथे यावर्षी तीव्र उष्णतेचा प्रकोप आहे, तसेच यावर्षी अनेक ठिकाणी पुराचा त्रास येथील नागरिकांना झाला आहे. देशाच्या हवामान खात्यानेही नागरिकांना हवामान बदलाचे नाव देऊन अनेक इशारे दिले आहेत. नानजिंगमध्ये नागरिकांनी उष्णतेपासून वाचण्यासाठी आश्रयस्थानांचा आसरा घेतला आहे. पुर्वी एकदा हे आश्रयस्थान युद्धात बॉम्बस्फोट टाळण्यासाठी बनवले गेले होते.
India Heavy Rainfall Countries facing Heat wave Red Alert Weather Forecast