मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलीकडच्या काळात मधुमेहाचा भारतीयांच्या जीवनावर मोठा परिणाम दिसून आला आहे. ज्यामुळे आपला देश झपाट्याने या आजाराचे केंद्र बनत आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार २०१९ मध्ये भारतात जवळपास ७७ दशलक्ष लोकांना मधुमेह होता आणि २०४५ पर्यंत ही आकडेवारी १३४ दशलक्षांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.
डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा सांगतात मधुमेह किंवा उच्चरक्तदाब यांसारखे असंसर्गजन्य आजार जीवनशैलीशी निगडित असल्याने हे आजार अपरिहार्य आहेत. त्यामुळे त्यांना हाताळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली राखणे, ज्यामुळे हे आजार होण्याची शक्यता कमी होते.
ते पुढे म्हणाले, वयोवृद्ध व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येते, पण डॉ. बत्रा’ज यांना तरूणांमध्ये देखील हा आजार आढळून आला आहे. ही चिंताजनक बाब आहे. परिणामी, मधुमेहावरील उपचार सर्वांगीण असणे अत्यावश्यक बनले आहे. मधुमेह हा प्रामुख्याने जीवनशैलीसंबंधित आजार आहे हे पाहता होमिओपॅथी हा विशेषतः चांगला पर्याय आहे. होमिओपॅथीमध्ये मानसिक व भावनिक घटकांचा विचार केला जातो, ज्यामुळे तणाव व चिंतेसह आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
आणखी एक बाब म्हणजे इन्सुलिनसह समकालीन किंवा फार्मास्युटिकल औषधोपचारांसोबत होमिओपॅथिक औषधे सुरक्षितपणे घेता येऊ शकतात. योग्य होमिओपॅथिक उपाय साइड इफेक्ट्सशिवाय नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतील.
आजारपण ते फिटनेससंदर्भात घेतल्या जाणाऱ्या काळजीसोबत सर्व पौष्टिक घटक असलेला आरोग्यदायी आहार सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. व्यायामाने मदत होऊ शकते, तुमच्या इन्सुलिन सेन्सिटिव्हीटीला चालना मिळू शकते. म्हणून दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला डॉ. बत्रा देतात.
या आजाराच्या उपचारात योगदान देत डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरने ६,००० हून अधिक मधुमेही रुग्णांवर होमिओपॅथी उपचार केले आहेत. डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांच्या दैनंदिन जीवनात संतुलन व सुसंगतपणा प्राप्त झाला आहे आणि त्यांनी आरोग्यदायी, गुणकारी व दीर्घकाळ टिकणारे परिणाम देखील अनुभवले आहेत.
India Health Diabetes Increasing Drastically
Disease