मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या अनेक प्रकारच्या खाद्य संस्कृतींमुळे, येथे विविध प्रकारच्या पाककृतींचा आनंद घेण्याची संधी आहे. इथले स्ट्रीट-फूड जगभर प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक शहरात खवैय्यांना काहीतरी खास खायला मिळेल. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला इथल्या स्ट्रीट-फूडमधून शहराची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. रस्त्यावरील जीवन आणि तेथील खाद्यपदार्थ यावरून या शहराबद्दल देखील सर्व काही शिकू शकता. त्यामुळे तुम्हीही खाद्यप्रेमी असाल तर या 6 शहरांना नक्की भेट द्या.
लखनौ:
उत्तर प्रदेशातील हे ऐतिहासिक शहर खाद्यप्रेमींच्या यादीतही आहे. कारण इथले स्ट्रीट फूड तुम्ही खाल्ले नाही तर काय खाल्ले? येथे तुम्हाला अप्रतिम टुंडे के कबाबपासून अनेक प्रकारची बिर्याणी आणि शाकाहारी पदार्थ मिळतील.
दिल्ली:
दिल्ली हे देशातील सर्वात चकाचक शहर आहे आणि स्ट्रीट फूड ही इथली खासियत आहे यात शंका नाही. तुम्हाला इथे चाट आवडेल, तसेच इथले प्रसिद्ध गोलगप्पा तुम्ही खाऊ शकता. याशिवाय शहरभर छोले भटुरे, बिर्याणीचे विविध प्रकार ट्राय करू शकता. दिल्ली हे मोमोज साठीही ओळखले जाते.
कोलकाताः
या शहराला तुम्ही स्ट्रीट फूडचा राजा म्हणू शकता. प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ येथे उपलब्ध आहेत. चायना टाउनमधील बाओपासून स्वस्त रस्त्यावरील बंगाली खाद्यपदार्थ आणि काठी रोल्सपर्यंत, हे सर्व खाऊ पहावे. तसेच येथे मिळणाऱ्या पुचका आणि मिठाईचा आनंद घ्या.
अमृतसर:
पवित्र सुवर्ण मंदिराचे घर, अमृतसर हे आश्चर्यकारक चमत्कारांनी भरलेले सक्रिय शहर आहे, त्यापैकी एक स्ट्रीट फूड आहे. इथला प्रसिद्ध अमृतसरी कुलचा जरूर खावा आणि त्यासोबत मोठा ग्लास लस्सी प्या. हिवाळ्यात इथे गेलात तर मक्की की रोटी आणि सरसों का साग ही खा. जर मांसाहाराचे शौकीन असाल तर तुम्ही बटर चिकन, चिकन टिक्का यांसारख्या पदार्थही ट्राय करून पाहू शकता.
मुंबई:
मायानगरी असलेले हे शहर त्याच्या ग्लॅमरसाठी ओळखले जाऊ शकते, परंतु हे एक असे ठिकाण आहे जिथे एक से एक स्ट्रीट फूड देखील मिळेल. वडापाव खाल्ल्याशिवाय हे शहर कोणी सोडू शकत नाही, कारण तो शहराच्या कानाकोपऱ्यात मिळेल. याशिवाय तुम्ही मिसळ पाव, बॉम्बे सँडविच आणि पारसी फूड देखील ट्राय करू शकता.
मदुराई:
हे शहर तामिळनाडूचा आत्मा असल्याचे म्हटले जाते आणि मदुराई हे निश्चितपणे भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. मदुराईचे रस्ते अप्रतिम आहेत, इथे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. डोसापासून ते इडली आणि मांसाहारापर्यंत, तामिळनाडूचे हे शहर खाद्यप्रेमींसाठी सर्वोत्तम आहे.