नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात मधुमेहाचा विळखा घट्ट होत असल्याची बाब समोर येत आहे. बजलत्या जीवनशैली आणि आहारामुळे मधुमेहाचा आजार नागरिकांना जडत आहे. चिंताजनक म्हणजे, २० ते ७९ वर्षे वयोगटातील तब्बल ७४.२ दशलक्ष जणांना मधुमेहाची लागण झाली आहे. तशी अधिकृत माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. २० ते ७९ वर्षे वयोगटातील तब्बल ७४.२ दशलक्ष रुग्ण सध्या भारतात आहेत. त्याची दखल घेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने विविध उपक्रम देशात राबविण्यात येत आहेत. तशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संसदेत दिली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा (एनएचएम) भाग म्हणून,राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर आणि संसाधनांनावर आधारित कर्करोग, मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि पक्षाघात (एनपीसीडीसीएस ) यांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते. पायाभूत सुविधा बळकट करणे, मनुष्यबळ विकास, असंसर्गजन्य रोगांना (एनसीडी ) प्रतिबंध करण्यासाठी आरोग्ययसंदर्भात प्रचार आणि जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान, व्यवस्थापन तसेच उपचारांसाठी योग्य स्तरावरील आरोग्य सेवा सुविधा संदर्भित करणे यांवर कार्यक्रमाचा भर आहे.
सामान्य असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध, नियंत्रण आणि तपासणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत लोकसंख्या-आधारित उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आणि हा सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेचा एक भाग आहे. या उपक्रमांतर्गत, ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या तपासणीवर भर दिला जातो. मधुमेहासह या सामान्य असंसर्गजन्य आजारांची तपासणी हा आयुष्मान भारत – आरोग्य आणि निरामयता केंद्रांतर्गत सेवा वितरणाचा अविभाज्य भाग आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विनामूल्य औषध सेवा उपक्रमांतर्गत, गरीब आणि गरजू लोकांसाठी इन्सुलिनसह विनामूल्य अत्यावश्यक औषधांच्या तरतुदीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. याशिवाय, राज्य सरकारांच्या सहकार्याने ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना’ (पीएमबीजेपी ) अंतर्गत, इन्सुलिनसह दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जातात.
गरीब आणि गरजूंसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार एकतर विनामूल्य किंवा अत्यंत अनुदानित दरात दिले जातात. सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणना (एसईसीसी ) डेटाबेस २०११ नुसार एबी -पीएमजेएवाय अंतर्गत पात्र १०.७४ कोटी कुटुंबांसाठी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय ) अंतर्गत रूग्णांसाठी उपचार देखील उपलब्ध आहेत.
जैवतंत्रज्ञान विभागाच्या ‘दुर्धर आजार ’अंतर्गत मधुमेहासह उच्च आजाराचा भार असलेल्या क्षेत्रांमध्ये संशोधनास पाठबळ देतो. मधुमेह आणि चयापचय संबंधी आजार हे प्रमुख महत्त्वाचे क्षेत्र राहिले आहेत आणि संबंधित आजारांवर मात करणे आणि प्रकार II मधुमेह आणि मधुमेहावर नवीन औषध शोधण्याच्या दृष्टीने मोलिक्युलर यंत्रणांमध्ये सखोल सूक्ष्म ज्ञान मिळविण्यासाठी अनेक प्रकल्पांना पाठबळ देण्यात आले आहे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
India Diabetes Disease Health Current Status Parliament
Dr Bharti Pawar