मुंबई – भारताने आठवड्याच्या प्रारंभीच क्रिकेटप्रेमींना गुडन्यूज दिली आहे. न्यूझीलंडच्या संघाचा तब्बल ३७२ धावांनी पराभव झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी निकाल लागला आहे. मयांक अग्रवालने बहारदार खेळी केल्याने त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे. पहिल्या डावात त्याने शानदार दीड शतक तर दुसऱ्या डावात ६२ धावा केल्या. आजचा सामना जिंकून भारताने आणखी एक विक्रम केला आहे. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आजवच्या सर्वाधिक धावांनी प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच अवघ्या एक तासातच भारताने सामना जिंकला. त्यामुळे भारतीय संघाने मोठा जल्लोष केला. न्यूझीलंडच्या संघासमोर भारताने ५४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, न्यूझीलंडचा संघ अवघ्या १६७ धावातच गुंडाळला गेला. कानपूर येथील पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यावर सगळ्यांचे लक्ष होते. भारताने ही कसोटी जिंकून मालिकाही खिशात घातली आहे.
धावफलक असा
पहिला डाव
भारत – ३२५
न्यूझीलंड – ६२
दुसरा डाव
भारत – २७६
न्यूझीलंड – १६७
https://twitter.com/BCCI/status/1467731958264258561