इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेन संकटावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, युक्रेनमधील मानवतावादी गरजा लक्षात घेऊन भारत सरकारने औषधांसह तत्काळ मदत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत उद्या युक्रेनच्या नागरिकांकडे पाठवली जाईल. तिरुमूर्ती म्हणाले की, युक्रेनमधील युध्द व घडामोडींची भारताला काळजी आहे. याशिवाय मध्यपूर्वेतील सीरियातील परिस्थिती पाहता, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनमधील समुपदेशक प्रतीक माथूर यांनीही बैठकीत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद्यांकडे रासायनिक शस्त्रे असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान दोन्ही देशांनी सोमवार 28 फेब्रुवारी रोजी प्रथमच समोरासमोर चर्चा केली. रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बेलारूसमध्ये साडेतीन तास चर्चा केली. तथापि, ही चर्चा निष्फळ राहिली आणि युद्ध थांबविण्याचा कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या चर्चेतून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनचा मुख्य मुद्दा युद्धाचा तात्काळ समाप्ती आणि रशियन सैन्याची माघार हा असेल. तथापि, परदेशी मीडियाच्या वृत्तानुसार, युक्रेनने या संभाषणात रशियाला डॉनबाससह संपूर्ण देशातून आपले सैन्य मागे घेण्याची तसेच क्रिमिया सोडण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या संभाषणातून रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना काय हवे आहे? किंवा मागणी काय आहे? हे सध्या स्पष्ट झालेले नाही. दोन्ही देशांमधील हे संभाषण बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सौजन्याने झाले. बेलारूस हा युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांचा शेजारी देश आहे.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली रशियाच्या सुरक्षेच्या हिताचा विचार केला तरच युक्रेनवर तोडगा निघू शकतो. युनायटेड नेशन्समध्ये युक्रेनवर तातडीची बैठक दरम्यान, सोमवारी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीची 11 वी तातडीची बैठक युक्रेनवर झाली. युक्रेनच्या युनायटेड नेशन्समधील प्रतिनिधीने सांगितले की, आतापर्यंत युक्रेनमधील 16 मुलांसह 352 लोकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढतच आहे. अजूनही गोळीबार सुरू आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी आपत्कालीन बैठकीत युक्रेनसाठी सर्व शक्य मदत करण्याचे सांगितले. अँटोनियो गुटेरेस म्हणाले, मानवतावादी मदत महत्त्वाची आहे, तो उपाय नाही, शांततेतूनच एकमेव उपाय आहे. मी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आश्वासन दिले आहे की संयुक्त राष्ट्र मदत करत राहील, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.