‘इंडिया दर्पण’वर प्रमोद गायकवाड यांची विशेष लेखमाला
व्यथा आदिवासींच्या…!
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही राज्याच्या लोकसंख्येच्या १०% असलेल्या आदिवासी समाजाची हेळसांड सुरूच आहे. तरीही असे उपेक्षित जिणे जगणाऱ्या आदिवासींच्या प्रश्नांना माध्यमांमध्ये पुरेसे स्थान नाही. ही विषमता थांबावी आणि व्यवस्थेचे लक्ष आदिवासींच्या प्रश्नांकडेही वळावे यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद गायकवाड यांची “व्यथा आदिवासींच्या” ही अभ्यासपूर्ण लेखमाला दर शनिवारी सुरु करत आहोत. गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आदिवासी भागातील दोन लाखांहूनही अधिक लोकांसाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. या दरम्यानचे प्रत्यक्ष अनुभव आणि आदिवासी भागातील समस्यांवर झालेल्या अभ्यासातून त्यांनी ही लेखमाला लिहिली आहे. आपले नेते, अधिकारी आणि सुशिक्षित तरुण यांच्यापर्यंत वास्तव पोहोचावे आणि त्यातून काही सकारात्मक बदल घडावेत हा आमचा हेतू आहे. नेहमीप्रमाणेच वाचक या सामाजिक जाणिवेने समृद्ध लेखमालेला प्रतिसाद देतील याचा आम्हाला विश्वास आहे.
– संपादकीय विभाग, इंडिया दर्पण
India Darpan Special Article Series Vyatha Aadivasinchya
Trible Issues