इंडिया दर्पण प्रस्तुत विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन
रामायण हे केवळ एक महाकाव्यच नाही तर रामायण म्हणजे भारतीय संस्कृती ,रामायण म्हणजे वैदिक संस्कार. प्रत्येक भारतीय मनाच्या देव्हार्यात रामायण घर करून बसलेलं आहे. विशेष म्हणजे रामायण न वाचता देखील आपल्यापैकी अनेकांना त्यातले अनेक पात्र अनेक प्रसंग ठावुक असतात. ‘वाल्मीकि रामायण’ आणि तुलसीदासांचे ‘रामचरित मानस ‘या शिवाय जगातील अनेक भाषांत अक्षरश: हजारो रामायण लिहिली गेली आहेत.

मो. ९४२२७६५२२७
रामायण या रामानंद सागर यांच्या अफाट लोकप्रिय दूरदर्शन मालिकेमुले तर रामायण जगातील प्रत्येक भारतीय घरांत जावून पोहचले आहे. रामायणा वर अनेक चित्रपट देखील आलेले आहेत. रामायणाची लोकप्रियता पाहून IRCTC म्हणजे भारतीय रेल्वेने रामायण एक्सप्रेस नावाची एक विशेष सुपर डिलक्स एक्सप्रेस रेल्वे सुरु केली आहे.
दिल्लीहून ही रामायण एक्सप्रेस निघते आणि रामायणातील महत्वाचे प्रसंग जिथे जिथे घडले त्या स्थलांचे दर्शन घडविते. सर्व प्रकारच्या निवास व भोजनाच्या पंचतारांकित सुविधा या प्रवासात पुरविल्या जातात. अयोध्येपासून रामेश्वरम पर्यंत ८००० किमी चा प्रवास ही रेल्वे १८ दिवसांत पूर्ण करते.रामायण एक्सप्रेसचे फर्स्ट क्लासचे भाड़े १०२००० + आणि सेकंडक्लासचे भाड़े ८२,०००+ रूपये असते. तर अशीच एक सुपर डिलक्स लेखमाला इंडिया दर्पण आपल्या वाचकांसमोर सादर कृत आहे.
https://twitter.com/SortedEagle/status/1460524986863546370?s=20
रामायण यात्रा दर्शन मध्ये वाल्मीकि रामायण मध्ये घडलेले प्रसंग आणि हे प्रसंग जिथे घडले त्या स्थानांचे आजचे दर्शन करून देण्यात येईल. तसेच येथे कसे जावे? येथील निवास व भोजन सुविधा याविषयी माहिती देण्यात येईल. रामायण यात्रा दर्शन ही मलिका वाचकांच्या पसंतीस पडेल अशी अशा आहे. आपल्या प्रतिक्रिया ,अनुभव आणि सूचना कृपया अवश्य पाठवा.
https://twitter.com/PiyushGoyal/status/1016746480735055873?s=20
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७
India Darpan Ramayana Yatra Darshan Special Article Series